Gulabi Sadi Viral Song in Pakistan : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणााऱ्या 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याची चांगलीच क्रेझ आहे. इन्स्टाग्रामवर या गाण्यावर मोठ्या प्रमाणावर रील्स तयार होत आहेत. या गाण्यावर फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडमधील सेलेब्सही थिरकले आहेत. गुलाबी साडी या गाण्याची क्रेझ पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानमधील या गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 


गुलाबी साडी या गाण्यावर आफ्रिकेतील किली पॉलदेखील थिरकले आहेत.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गुलाबी साडी  या गाण्याची क्रेझ आयपीएलमध्येही दिसून येत आहे. हे गाणं आता थेट पाकिस्तानमध्ये चांगलंच गाजलं आहे. या गाण्यावर जोडपं चांगलंच थिरकले आहेत. 


पाकिस्तानमध्ये 'गुलाबी साडी' या गाण्यावर थिरकणारा तरुण हा मराठी असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर प्रकाश या मराठी तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गुलाबी साडी या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अमर प्रकाशच्या विवाह सोहळ्यातील आहे. या गाण्यावर अमर आणि त्याची पत्नी थिरकताना दिसत आहे. तर, पाहुणे मंडळींनी गाणे आणि त्यांच्या परफॉर्मन्सला चांगलीच दाद दिली आहे. 


हा व्हिडीओ शेअर करताना त्याने,  “जेव्हा तुम्ही पाकिस्तानमधील मराठमोळ्या लग्नसमारंभात ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स करता…”, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर संजू राठोडनेही कमेंट करत खूपच छान अशी प्रतिक्रिया दिली आहे.


 






'गुलाबी साडी' या गाण्याची जगभरात क्रेझ पाहायला मिळते. अनेक ट्रेंडिग रिल्स या गाण्यावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड लावले आहे. 


इतर संबंधित बातमी :