Sai Pallavi Movie Collection : एकीकडे दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दोन बॉलिवूड चित्रपटांची टक्कर पाहायला मिळाली. सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 चित्रपट रिलीज झाले, यामुळे बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यन आणि अजय देवगणची टक्कर पाहायला मिळाली. असं असतना साऊथ चित्रपटाने मात्र, बाजी मारली आहे. साई पल्लवीच्या अमरन चित्रपटाने बॉलिवूड स्टार्सला चांगलाच झटका दिला आहे. साई पल्लवी स्टारर अमरन चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. 31 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या अमरन चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 100 कोटींचा गल्ला जमवला.
कार्तिक आर्यन-अजय देवगणची टक्कर अन् साई पल्लवीची बाजी
'अमरन' या तमिळ चित्रपटाला भारतासह जगभरातील चाहत्यांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. तामिळ सिनेमा 'अमरन'ने जगभरात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी चांगलं कलेक्शन केलं असून अजूनही चित्रपटाची कमाई सुरुच आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच 7.45 कोटींचा व्यवसाय केला होता. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर आधीच 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'अमरन' चित्रपटाची 100 कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री
राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित 'अमरन' सध्या थिएटरमध्ये धमाका करत आहे. शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी स्टारर 'अमरन' चित्रपट केवळ तामिळनाडूत किंवा भारतातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने दमदार कलेक्शन केलं. 'अमरन' 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. पहिल्या वीकेंडमध्येच या चित्रपटाने 80 कोटींहून अधिक कमाई केली.
अमरन वीकेंड कलेक्शन
Sacknilk वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 'अमरन' चित्रपटाने पहिल्या दिवशी 21.4 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी 19.15 कोटींची कमाई केली. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 21 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि चौथ्या दिवशी 21.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने भारतात 83.1 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'अमरन' चित्रपटात शिवकार्तिकेयन, साई पल्लवी, भुवन अरोरा, राहुल बोस आणि श्रीकुमार यांच्या भूमिका आहेत.
जगभर दमदार कलेक्शन
'अमरन' चित्रपटाने जगभरात रिलीजच्या पहिल्याच दिवशी 24.7 कोटींचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21.95 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 24.15 कोटींचा व्यवसाय केला असून, या चित्रपटाला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी 24.8 कोटींचा व्यवसाय केला आहे. याने वीकेंडसह बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :