एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रणबीर आणि आलियामध्ये सध्या 'आल इज नॉट वेल'?
आलिया सातत्याने नीतू कपूर यांच्या संपर्कात असून ती अनेकदा ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कलाही गेली आहे.
मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी एक समजलं जातं. काही दिवसांपूर्वी दोघांनी मीडियासमोर आपल्या नात्याची कबुलीही दिली होती. पण रणबीर आणि आलियामध्ये सध्या काही आलबेल नसल्याचं वृत्त आहे.
आजकाल रणबीर आलियापासून थोडा दूर राहत आहे. याचं कारण दुसरी अभिनेत्री नाही तर स्वत: आलिया आहे. आलियाचे सतत सुरु असणारे फोन कॉल आणि मेसेजमुळे रणबीर त्रस्त आहे. तर आपल्या नात्यासाठी आलियाला रणबीरचा वेळ हवा आहे. मात्र रणबीरला आलियाचं हे वागणं रुचत नाही. रणबीरच्या या वागण्यामुळे आलिया नाराज असल्याचं कळतं.
आलिया सातत्याने नीतू कपूर यांच्या संपर्कात असून ती अनेकदा ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कलाही गेली आहे. यावरुनच आलिया रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबाबत किती सीरियस आहे हे समजतं. कपूर कुटुंबानेही आलियाला स्वीकारलं आहे. या वर्षअखेरीस आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकावेत, अशीच त्यांची इच्छा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement