Happy Birthday Alka Yagnik : आपल्या सुरेल आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांचा आज 56 वा वाढदिवस साजरा आहे. अलका याज्ञिक यांनी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गाणी आपल्या आवाजात दिली आहेत. अलका यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे झाला, आज जगभरात त्यांचे चाहते आहेत. अलका या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांनी आई शुभा याज्ञिक यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकले आणि लहान वयातच गायला सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी अलका याज्ञिक यांनी पहिले गाणे गायले होते. वयाच्या 10 व्या वर्षी अलका आपल्या आईसोबत मुंबईत आल्या आणि चित्रपट निर्माता राज कपूर यांची भेट घेतली. राज कपूर यांना त्यांचा आवाज आवडला आणि त्यांनी त्यांची लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशी ओळख करून दिली.


लहान वयातच करिअरला सुरुवात


त्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी अलका यांनी 'पायल की झंकार' चित्रपटामधील 'थिरकट अंग लचक झुकी' हे गाणे गायले. प्रोफेशनल लाईफसोबतच अलका याज्ञिक त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत होत्या. अलका यांनी 1989 मध्ये शिलाँगमधील बिझनेसमन नीरज कपूरसोबत लग्न केले. लग्न होऊनही ती गेल्या 27 वर्षांपासून त्या पतीपासून वेगळी राहत आहेत. पण गंमत म्हणजे लग्नानंतर दूर राहण्याचं कारण भांडण नसून दोघांचं काम आहे. अलका याज्ञिकची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. दोघांची पहिली भेट रेल्वे स्टेशनवर झाली होती, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अलकाने 1988 मध्ये तिच्या पालकांशी लग्नाबद्दल बोलणं केलं.


लग्न होऊनही पतीपासून 27 वर्षे दूर


अलका आणि नीरज यांच्या नात्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही अडचण नव्हती. पण अलका यांच्या करिअरचे काय होणार हीच चिंता होती. खरंतर अलका आणि नीरज दोघांची कामं वेगळी होती. अशा परिस्थितीत नंतर नात्यात कोणतीही अडचण येऊ नये, असे कुटुंबीयांना वाटत होते. मात्र दोघांनी घरच्यांना लग्नासाठी राजी केले. लग्नानंतर अलका बहुतांश काळ मुंबईत राहिल्या, तर नीरजही शिलाँगमध्ये आपला व्यवसाय सांभाळत होते. कधी-कधी वेळ काढून दोघेही एकमेकांना भेटतात. अलका आणि नीरज यांच्यात दूर असूनही खूप चांगले संबंध आहेत. दोघांनाही एक मुलगी असून तिचे लग्न झाले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha