Pankaj Tripathi : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. पंकज त्रिपाठी यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या मेहनतीने आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठीने ओटीटीवरही स्वतःची छाप सोडली आहे. आज आम्ही तुमच्यासोबत या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत.
पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला. त्यांनी स्वतःबद्दल आणि पत्नी मृदुलाबद्दल बोलताना सांगितले की, ते 1993 मध्ये त्यांची पत्नी मृदुलाला भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी 2004 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यावेळी त्यांच्याकडे भाड्याने घर घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळेच ते पत्नीला सोबत बॉइज हॉस्टेलमध्ये ठेवले होते.
अभिनेत्याने पुढे खुलासा केला की, लग्नानंतर ते पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे. मुले वसतिगृहात खूप आरामशीर राहतात. मात्र, माझी पत्नी मृदुलासोबत राहत असल्याने हॉस्टेलमधील सर्व मुले अतिशय सभ्य पद्धतीने राहत होते.
पंकज त्रिपाठी यांनी पुढे सांगितले की, काही काळानंतरने त्यांच्या वॉर्डनला ही बाब कळाली. यानंतर एके दिवशी वॉर्डन त्यांच्याकडे आला आणि त्याने आपल्याला भाड्याच्या घरात कधी शिफ्ट होत आहे, अशी विचारणा केली.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Anushka Sharma Production House : अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार, सख्ख्या भावासोबतची भागीदारी तोडली
- Alia Bhatt Upcoming Films : 'गंगूबाई काठियावाडी'नंतर आलियाचे पाच बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha