Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. जेठालाल बापूजींना किती घाबरतो हे सर्वांनाच माहीत आहे. बापूजींच्या एका आवाजावर जेठालालला चांगलाच घाम फुटतो. जेठालाची क्रश बबिता जी आहे. एकदा बबिता जी जेठालालसमोर आली की त्याची वेळ तिथेच थांबते. यावेळी जेठालालने बबिताजींसोबत बोलत होता, मात्र यावेळी बापूजी त्याला पाहतात आणि त्याचा चांगलाच समाचार घेतात.
बापूजी घेणार जेठालालचा समाचार
जेठालाल बापूजींना किती घाबरतो हे तुम्हाला आधीच माहीत आहे. बापूजींनी नुसता आवाज जरी दिला तरी जेठालालला घाम फुटतो. यावेळीही असाच मोठा गोंधळ होणार आहे. जेठालाल बाल्कनीत सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी आला. यावेळी त्याला बबिता दिसते आणि मग काय जेठालालचा दिवस गुलाबी गुलाबी होऊन जातो. बबिताजींशी बोलत असताना तो सर्व काही विसरून जातो. बबिताशी बोलत असताना बापूजी घराबाहेर येतात आणि दारावरची बेल वारंवार वाजवतात मात्र जेठालाल बबितासोबत बोलण्यात इतका मग्न असतो की त्याला दारावरची बेल एकू जात नाही.
बराच वेळ दरवाजा न उघडल्याने बापूजींचा राग वाढतो आणि ते पायऱ्या उतरून कंपाऊंडमध्ये येतात तेव्हा त्यांनी जेठालाल बाल्कनीमध्ये असल्याचे दिसते. यानंतर बापूजींचा राग अनावर होतो आणि ते जेठालालचा समाचार घेतात.
गोकुळधाममधून 'पॉम पॉम'चा निरोप
दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मामधील 'पॉम पॉम'चा अध्याय आता संपला आहे. टप्पू सेनेने सगळ्यांना हकीकत सांगितली. त्यानंतर सर्वांना टप्पू सेनेवर खूप राग आला, मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी टप्पू सेनेची चूक समजावून सांगितली. यानंतर पोपटलालनेही टप्पू सेनेला माफ केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळलं तेव्हा...
- होळीनिमित्त जयपूरला आलेल्या परदेशी तरुणीवर अत्याचार, पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आरोपी
- Healthy Lifestyle : 'या' 10 कारणांमुळे बहुतेक लोक गंभीर आजाराला बळी पडतात, तुम्हीही दुर्लक्ष करताय का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha