Alia Bhatt on Mental Health : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) ही तिचे विचार कायमच परखडपणे मांडत असते. त्याचप्रमाणे ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उघडपणे खुलासा केला आहे. आलियाने नुकतच मानसिक आरोग्यावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक आठवड्याला मानसिक आरोग्यावर थेरेपी घेतेय आणि त्याचा माझा आयुष्यात मला बराच फायदा झाला आहे.
तसेच यामुळे माझ्या आयुष्यातही खूप बदल झाले असून मुलीचा सांभाळ करण्यासाठी देखील मला याचा फायदा होत असल्याचं आलियाने सांगितलं. त्याचप्रमाणे आलियाने यामुळे तिच्या आयुष्यात होणारे बदल याविषयी देखील भाष्य केलं आहे. त्यामुळे आलिया दर आठवड्याला मानसिक आरोग्यासाठी थेरपी का घेते याचा खुलासा झाला आहे. दरम्यान आलियाने बॉडी शेमिंगवर भाष्य केलं होतं. तिच्या या वक्तव्याची देखील बरीच चर्चा झाली होती.
आलिया भट्टने काय म्हटलं होतं?
आलियाने वोगला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, मी माझ्या मानसिक आरोग्यासाठी खूप मेहनत घेतो. मी दर आठवड्याला थेरपीला जाते, जिथे मी माझ्या आयुष्यातल्या भीतीविषयी बोलते. असं काही नाही की एखादी गोष्ट मला लगेच पहिल्या, पाचव्या किंवा दहाव्या दिवशी समजेल. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण तुम्हाला नवीन काहीतरी करण्यास सक्षम असणंही तितकचं गरजेचं आहे. असं काही नसतं की, मला आता सगळं मिळालं आहे, मी सगळं व्यवस्थित सांभाळेन आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणून मी प्रत्येक आठवड्याला माझ्या मानसिक आरोग्यासाठी थेरपी घेते. ज्याचा माझ्या आयुष्यात बराच फायदा झाला.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्ट वासन बालाच्या 'जिगरा' चित्रपटात दिसणार आहे. याची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. याशिवाय तिच्याकडे संजय लीला भन्साळीचा 'लव्ह अँड वॉर' देखील आहे, ज्यामध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत दिसणार आहे.