Alia Bhatt Rejected Movies : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आलियाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट (Alia Bhatt Movies) दिले आहेत. स्टार किड असलेल्या अभिनेत्रीने 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 


'स्टुडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलियाने 'हायवे','राजी','ब्रह्मास्त्र' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण अनेक चांगल्या सिनेमांसाठी मात्र तिने नकार दिला आहे. तब्बल सात सिनेमांसाठी आलिया फर्स्ट चॉईस होती. पण तिने यावर लाथ मारून पायावर धोंडा मारुन घेतला.


आलियाने लाथ मारलेल्या सात सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Alia Bhatt Rejected Movies)


1.) गोलमाल अगेन (Golmaal Again)


बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टीचा 'गोलमाल' हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सीरिजमधील चौथा सिनेमासाठी अर्थात 'गोलमाल अगेन'साठी (Golmaal Again) निर्मात्यांनी पहिल्यांदा आलिया भट्टची निवड केली होती. अभिनेत्री या सिनेमासाठी उत्सुक होती. पण नंतर तिने या सिनेमासाठी आपला नकार कळवला. त्यामुळे 'गोलमाल अगेन' हा सिनेमा परिणीती चोप्राला (Parineeti Chopra) मिळाला. 


2.) साहो (Saaho)


दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा 'साहो' (Saaho) हा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमासाठी श्रद्धा कपूरआधी आलियाला विचारणा झाली होती. मुख्य अभिनेत्रीला जास्त स्क्रीन स्पेस मिळत नसल्याने आलियाने हा सिनेमा नाकारला होता.


3.) शेरशाह (Shershaah)


बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्राच्या करिअरमध्ये 'शेरशाह' या सिनेमाचा महत्त्वाचा वाटा आहे. या सिनेमासाठीदेखील आलिया भट्ट निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण अभिनेत्रीला व्यस्त वेळापत्रकामुळे हा सिनेमा करता आला नाही.


4.) नीरजा (Neerja)


आलिया भट्टने नाकारलेला एक सर्वोत्तम चित्रपट म्हणजे सोनम कपूर (Sonam Kapoor) स्टार 'नीरजा' होय. या सिनेमासाठी निर्मात्यांनी सर्वात आधी आलियाला विचारणा केली होती. पण उंचीमुळे तिला हा सिनेमा करता आला नाही. वैमानिक सुंदरीच्या भूमिकेसाठी आलियाची उंची निर्मात्यांना खटकली. आलियाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने हा सिनेमा नाकारला. पुढे सोनम कपूरची या सिनेमात एन्ट्री झाली.


5.) ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs of Hindostan)


आमिर खान (Aamir Khan) स्टारर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाचाही या यादीत समावेश आहे. या सिनेमातील फातिमाच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी आधी आलियाला विचारलं होतं. पण सिनेमाचं कथानक पसंत न पडल्याने अभिनेत्रीने हा सिनेमा नाकारला.


6.) राब्ता (Raabta)


आलियाला सुशांत सिंह राजपूतच्या 'राब्ता' या सिनेमासाठीदेखील विचारणा झाली होती. पण नंतर अभिनेत्रीने या सिनेमासाठी नकार दिला. पुढे हा सिनेमा कृती सेननला (Kriti Sanon) मिळाला.


7.) वेक अप सिड (Wake Up Sid)


रणबीर कपूरसोबत काम करण्यासाठी आलिया नेहमीच खूप उत्सुक होती. या सिनेमासाठी तिने ऑडिशनदेखील दिली होती. पण काही कारणाने आलियाला रणबीरसोबत हा सिनेमा करता आला नाही.


संबंधित बातम्या


'मधुबाला'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर साकारली जाणार, नव्या चित्रपटाची घोषणा, 'या' अभिनेत्रीला मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक