Suhana Khan Viral Video : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (Shahrukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.  आपला लूक आणि फॅशन स्टाइलने तिने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.आता, सुहाना खान (Suhana Khan) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुहाना खान ही बाथटबमध्ये दिसली आहे. त्यावरून काहीजण नाराज झाले असून रमझान सुरू आहे, काही तरी लाज बाळग असे युजर्सने म्हटले आहे. 


बाथटबमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली सुहाना


सुहाना खानने नुकतंच बाथटबमध्ये एक बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ त्याने आता त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये सुहानाने एका ब्युटी प्रोडक्टसाठी जाहिरात केली आहे. व्हिडीओत बाथटबमध्ये असणारी सुहाना ग्लॅमरस दिसत असून तिने हलका मेक-अप केला आहे. सुहानाच्या या खास व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुक केले आहे. तर, काहींनी तिच्यावर टीका केली आहे. 






सुहाना खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर


सुहाना खानचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. काही युजर्नसने सुहानाला ट्रोल केले असून विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “रमजान सुरू आहे, थोडी तरी लाज बाळग” असे एका म्हटले. तर, दुसऱ्याने एका युजरने रमजानमध्ये असे फोटोशूट योग्य नाही असे म्हटले. काहींनी सुहानाचे कौतुक केले आहे. 






सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार?


सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर देखील झळकले होते. सुहानाने 'द ग्रे पार्ट' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. आता सुहाना लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सुहाना खानची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर ती  तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.