Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही जोडी सध्या त्यांच्या होणाऱ्या बाळामुळे चर्चेत आहे. लवकरच त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आलिया भट्ट प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आलिया सर एच एन रिलायंस रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म देणार आहे. 


अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली आहे. सकाळीच आलिया आणि रणबीर गिरगावच्या सर एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कोणत्याही क्षणी आलिया बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे.


पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आलियाची डिलीव्हरी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गिरगावातील 'एच.एन. रिलायंस फाऊंडेशन' या रुग्णालयात आलिया बाळाला जन्म देणार आहे. आलियाचे सासरे म्हणजेच ऋषी कपूर यांनादेखील प्रकृती बिघडल्यानंतर याच रुग्णालयात दाखल करण्यात होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


बाळाच्या जन्मानंतर आलिया घेणार ब्रेक 


अभिनेत्री आलिया भट्ट्ट बाळाच्या जन्मानंतर मॅटरनिटी लीव्हवर जाणार आहे. आलिया एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्ट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 


आलिया भट्टचं डोहाळ जेवण


लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात आलिया भटचं डोहाळ जेवण म्हणेज बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला होता. आलिया भट्टच्या बेबी शॉवरची बरीच चर्चाही झाली. या फंक्शनमधील फोटो समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.






आलिया भट्टचे आगामी सिनेमे


आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने सिनेमागृहाच चांगलाच धुमाकूळ घातला. आता आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.