Alia Bhatt Delivery : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या चर्चेत आहेत. लवकरच त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमण होणार आहे. रिलायंसच्या एच एन रुग्णालयात आलिया बाळाला जन्म देणार आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आलियाची डिलीव्हरी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. गिरगावातील 'एच.एन. रिलायंस फाऊंडेशन' या रुग्णालयात आलिया बाळाला जन्म देणार आहे. आलियाचे सासरे म्हणजेच ऋषी कपूर यांनादेखील प्रकृती बिघडल्यानंतर याच रुग्णालयात दाखल करण्यात होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने दिलेली गोड बातमी
सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने गोड बातमी दिली होती. आलिया याच वर्षी एप्रिल महिन्यात रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली होती. आलियाने सोनोग्राफी टेस्ट दरम्यानचा एक फोटो चाहत्यांनासोबत शेअर करत लिहिलं होतं,"आमचं बाळ लवकरच येत आहे".
बाळाच्या जन्मानंतर आलिया घेणार ब्रेक
बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
आलियाचे आगामी सिनेमे
आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने सिनेमागृहाच चांगलाच धुमाकूळ घातला. आता आलिया-रणबीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या