एक्स्प्लोर
अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’चं पोस्टर रिलीज, शूटिंगही सुरु

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'जॉली एलएलबी 2'च्या सिक्वेलची शूटिंग सुरु झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सुभाष कपूर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे.
अक्षय कुमार 'जॉली एलएलबी 2' सिनेमात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिनेमात मुख्य नायिका हुमा कुरेशी असणार आहे.
सिनेमाचा पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून, यात अन्नू कपूर आणि अक्षय कुमार आमने-सामने दिसत आहेत. बोमन ईराणींनी साकारलेली भूमिका या सिनेमात अन्नू कपूर साकारणार आहेत. न्यायाधीशाच्या भूमिकेत सौरभ शुक्ला पाहायला मिळणार आहेत.
https://twitter.com/akshaykumar/status/754995502773665792
सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, लखनऊमध्ये शूटिंग सुरु आहे. पुढल्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये सुरुवातीलाच हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे, 2017 मध्ये अक्षयचे नमस्ते लंडन आणि रोबोट 2 हे सिनेमेही रिलीज होणार असल्याने चाहत्यांना ट्रिपल डोज मिळणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
