Bollywood Celebs On Manipur Violence Incident:  मणिपूरमधील (Manipur) एका  घटनेने देशात खळबळ उडाली आहे. दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केल्या जात आहे. काही बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून मणिपूरमध्ये झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त केला. 


अक्षय कुमारचे ट्वीट


अक्षयनं (Akshay Kumar) ट्वीटमध्ये लिहिलं, 'मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून हादरलो. मला आशा आहे की दोषींना एवढी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असा भयानक कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही.'






रेणूका शहाणे (Renuka Shahane) यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,  'मणिपूरमधील अत्याचार रोखणारे कोणी नाही का? दोन महिलांच्या त्या त्रासदायक व्हिडीओने जर तुमचा थरकाप उडाला नसेल, तर स्वत:ला माणूस म्हणणे योग्य आहे का?'






अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि  रिचा चड्ढा (Richa Chadha) यांनी देखील ट्वीट केलं आहे.रिचा चड्ढानं ट्वीटमध्ये, 'लज्जास्पद! भयानक! नियमहीन!' असं लिहिलं आहे.










केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ही घटना अमानवीय असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधान मोदींना देखील विरोधकांचा सवाल