एक्स्प्लोर
बाळासाहेबांवरील चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत?

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. अक्षयकुमारने मात्र आपण ही व्यक्तिरेखा साकारण्याच्या पात्रतेचे आहोत की नाही, याबाबत साशंक असल्याचं म्हटलं आहे. निर्मात्यांनी याबाबत पुनर्विचार करावा, असं मतही त्याने व्यक्त केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रुस्तम'च्या यशानंतर त्याने संवाद साधला. 'बाळासाहेब हे काही सामान्य व्यक्तिमत्त्व नव्हतं. ठाकरेंचं व्यक्तित्व अत्यंत भारदस्त होतं. त्यामुळे सर्वांनीच याबाबत विचार करायला हवा. त्यामुळे मला याबाबत काहीच बोलता येणार नाही', असं अक्षयने स्पष्ट केलं. स्मिता ठाकरे आणि राहुल ठाकरे बाळासाहेबांवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मुख्य व्यक्तिरेखेसाठी चर्चेत असलेल्या काही नावांमध्ये अक्षयचा समावेश आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















