Bollywood Stars Support PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला लक्षद्वीप (Lakshadweep) दौरा केला आहे. लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर लक्षद्वीप जगभरात ट्रेडिंगमध्ये आहे. लक्षद्वीपच्या सौंदर्यावर मोदींनी भाष्य केल्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी भारतासंबंधित वादग्रस्त भाष्य केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी मालदीवला बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरू केला. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी यासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दोऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं होतं,"ज्यांना साहसी खेळ खेळण्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच लक्षद्वीपला जायला हवं. मी स्नॉर्केलिंगचा अनुभव घेतला आहे. हा आनंददायी अनुभव होता". मोदींनी लक्षद्वीपला प्रमोट केलेलं मालदीवकरांना आवडलं नाही आणि त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. आता बॉलिवूडकरांनी नरेंद्र मोदी यांना समर्थ देत खास पोस्ट शेअर केल्या आहेत. 


बॉलिवूडकरांचा प्रंतप्रधानांना सपोर्ट


बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने ट्वीट केलं आहे की,"आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर स्वच्छ आणि आश्चर्यकारक समुद्रकिनाऱ्यांवर पाहणे खूप छान आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा समुद्रकिनारा आपल्या भारत देशात आहे". 






अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिलं आहे,"मालदीवमधील प्रमुख पक्षाच्या व्यक्तींनी भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या. ज्या देशाने मालदीवला जास्तीत जास्त पर्यटक पाठवले, त्या देशाबद्दल ते असे बोलत आहेत... याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून आहोत, पण आपण असा अनाठायी द्वेष का सहन करावा? मी मालदीवला अनेक वेळा भेट दिली आहे आणि नेहमीच त्याची प्रशंसा केली आहे, परंतु प्रथम सन्मान महत्त्वाचा. चला #ExploreIndianIslands चा निर्णय घेऊया आणि आपल्या भारताच्या पर्यटनाला पुढे नेऊया". 






बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतने ट्वीट केलं आहे,"गंध? स्थायी गंध? लक्षद्वीपमध्ये 98% मुस्लिम समाज आहे. लक्षद्वीपमध्ये 60 हजार लोक राहतात. पण तरीही हे अज्ञात बेट आहे हे लज्जास्पद आहे".






जॉन अब्राहमने ट्वीट केलं आहे,"अतिथी देवो भव या कल्पनेने आणि विशाल सागरी जीवनाचा शोध घेऊन लक्षद्वीप हे खरोखरच भेट देण्यासारखे ठिकाण आहे". 


श्रद्धा कपूरने ट्वीट करत लिहिलं आहे,"सर्व फोटो मला लक्षद्वीपला भेट देण्यासाठी उत्सुकता वाढवणारे आहेत. खरोखरंच हा एक कमाल समुद्रकिनारा आहे. आता फक्त सुट्टीची प्रतीक्षा आहे". 


मधुर भंडाकरने लिहिलं आहे,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून लक्षद्वीपच्या मनमोहक समुद्रकिनाऱ्याची झलक पाहायला मिळाली आहे. त्यांच्या या दौऱ्याने मंत्रमुग्ध केलं आहे".


संबंधित बातम्या


Maldives : मोदींनी लक्षद्वीपच्या सौंदर्याचा आनंद तर लुटलाच, पण त्याचवेळी चीनधार्जिन्या मालदीवचीही हवा टाईट केली, मालदीवच्या अॅलर्जीवर भारताचा कडवट डोस