Movies Based On Prostitution And Red Light Areas : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची हिरामंडी ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या वेब सीरिजमध्ये जुन्या काळातील देहविक्री करणाऱ्या महिलांची कथा आहे. यामध्ये वेश्या व्यवसाय आणि रेड लाईट एरियातील वेगवेगळे पैलू समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विषयावर याआधीदेखील काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.यातील काही चित्रपट हे कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात. 


चमेली Chameli Movie


2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या चमेली या चित्रपटात करीना कपूरची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात एक विधुर व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेमधील मैत्रीचे संबंध दाखवण्यात आले. त्याशिवाय, या चित्रपटात समाजाच्या मानसिकतेवरही भाष्य करण्यात आले. 


कुठे पाहता येईल - हॉटस्टार


बेगम जान


 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. रेडक्लिफ लाईनमुळे भारत-पाकिस्तानमध्ये फाळणी झाली. या फाळणीच्या वादात अडकलेल्या गावात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची हवेली असते. आपले घर वाचवण्यासाठीचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 


कुठे पाहता येईल - हॉटस्टार


तलाश  Talaash 


आमिर खान, करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या या चित्रपटात भूमिका आहे. हा एक सायकोलॉजिकल हॉररपट आहे. या चित्रपटाच्या कथेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नाला अधोरेखित करण्यात आले आहे. 


कुठे पाहता येईल - प्राईम, नेटफ्लिक्स


बीए पास  BA Pass


बीए पास या चित्रपटाची चर्चा झाली होती. पुरुष वेश्या अर्थात जिगालो व्यवसायाकडे वळलेल्या गरजू युवकाभोवती या चित्रपटाची कथा आहे. शिल्पा शुक्ला आणि शादाब कमाल यांच्या भूमिका आहेत. 


कुठे पाहता येईल - प्राईम, नेटफ्लिक्स


 


लक्ष्मी Laxmi 


ही कथा लक्ष्मी नावाच्या एका चिमुरडीभोवती फिरते जिचे अपहरण करून तिला विकले जाते आणि वेश्या बनवले जाते. हा चित्रपट मानवी तस्करी आणि बाल वेश्याव्यवसाय या संवेदनशील विषयावर आधारित आहे.


कुठे पाहता येईल - प्राईम, नेटफ्लिक्स



चांदनी बार Chandani Bar


तब्बू, अतुल कुलकर्णी यांच्या दमदार भूमिका आणि मधुर भांडारकर यांचे दिग्दर्शन असलेला 'चांदनी बार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच केलीच, शिवाय समीक्षकांकडून कौतुकही मिळवले. तब्बूला या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बारबालांचे जगणे, गुन्हेगारी जगत आणि भ्रष्ट पोलिसांची हातमिळवणी या सगळ्या भोवती चित्रपटाची कथा आहे.


कुठे पाहता येईल - प्राईम, युट्यूब 


मंडी Mandi Movie 


या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. सर्वांना हा चित्रपट खूप आवडला आणि शबाना आझमी यांनीही यात चमकदार अभिनय केला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट  लेखक गुलाम अब्बास यांच्या आनंदी या उत्कृष्ट उर्दू लघुकथेवर आधारित आहे. हा चित्रपट एका शहराच्या मध्यभागी वसलेल्या वेश्यालयाची कथा सांगतो. हा चित्रपट राजकारण आणि वेश्याव्यवसायावर एक व्यंग्यात्मक विनोदी चित्रपट आहे आणि त्यात शबाना आझमी, स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. 


कुठे पाहता येईल - प्राईम, युट्यूब