एक्स्प्लोर

गुलशन कुमारवरील 'मोगल' सिनेमातून अक्षयकुमार बाहेर

दिग्दर्शकाने अक्षयच्या मागणीकडे कानाडोळा केला. त्यामुळे अक्षयने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे

मुंबई : कॅसेट किंग गुलशान कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'मोगल' चित्रपटातून अभिनेता अक्षय कुमारने काढता पाय घेतला आहे. अक्षयने सुचवलेले बदल दिग्दर्शकाला न रुचल्यामुळे झालेल्या मतभेदानंतर अक्षयने हा सिनेमा सोडल्याची चर्चा आहे. टी सीरिज प्रस्तुत, सुदेश कुमारी यांची निर्मिती असलेल्या मोगल या चित्रपटाला सुभाष कपूर यांचं लेखन-दिग्दर्शन आहे. अक्षयकुमारने सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल सुचवले होते. काही गोष्टींचं पुनर्लेखन करण्याचा सल्ला अक्षयने दिला होता. मात्र दिग्दर्शकाने अक्षयच्या मागणीकडे कानाडोळा केला. त्यामुळे अक्षयने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अक्षयने याबाबत निर्मात्यांना कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मार्च महिन्यात अक्षयने मोगल चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्या तारखा अक्षयने दुसऱ्या निर्मात्यांना दिल्याचं म्हटलं जातं. https://twitter.com/akshaykumar/status/841861776497074176 मोगलचा दिग्दर्शक सुभाष कपूर आणि अक्षयने यापूर्वी 'जॉली एलएलबी 2' या सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे, गुलशन कुमार यांची कन्या, प्रसिद्ध पार्श्वगायिका तुलसी कुमारने अक्षय हा गुलशन कुमार यांच्या भूमिकेसाठी अत्यंत योग्य अभिनेता असल्याचं म्हटलं होतं. 'अक्षय आणि माझ्या वडिलांमध्ये अनेक साम्यं आहेत. तोही पंजाबी आहे आणि आम्हीसुद्धा. तो दिल्लीचा आहे, तर माझे वडीलही दिल्लीचे होते. मला वाटतं तो ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारेल' असं ती म्हणाली होती. अक्षयकुमारचा पॅडमॅन हा चित्रपट 26 जानेवारीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, तर रजनीकांतसोबतचा '2.0' एप्रिलमध्ये रीलिज होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget