Akshay Kumar In Mahakal : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने वाढदिवशी महाकालेश्वराचं (Mahakal) दर्शन घेतलं आहे. त्याने पहाटेच्या भस्म आरतीचा अनुभवही घेतला आहे. भगवी वस्त्रे परिधान करत त्याने क्रिकेटपटू शिखर धवनसह (Cricketer Shikhar Dhawan) भस्म आरती केली.


अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू शिखर धवनने महाकालेश्वराचे आशीर्वाद घेतले आहेत. भारतीय संघाच्या विजयासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रार्थना केली. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना खिलाडी कुमार म्हणाला,"मी देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे". क्रिकेटर शिखर धवननेही अक्षय कुमारसोबत भस्म आरतीमध्ये सामील होत महाकालेश्वराची पूजा केली आहे.






अक्षय कुमार याआधीदेखील उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वराच्या दर्शनासाठी (Akshay Kumar Visit Mahakaleshwar Temple) गेला होता. आता अक्षय कुमार महाकालेश्वराच्या दर्शनाला आल्याचे कळताच चाहत्यांनी आणि भाविकांनी त्याला पाहण्यासाठी मंदीर परिसरात मोठी गर्दी केली होती.  


भस्म आरतीदरम्यान अक्षय कुमार महाकालेश्वराच्या भक्तीत लीन झालेला पाहायला मिळाला. विशेष म्हणेज अक्षय कुमार सहकुटुंब महाकालेश्वराच्या दर्शनाला आला होता. भस्म आरती केल्यानंतर अभिनेत्याने नंदी हॉलमध्ये पूजा केली. त्यावेळी त्याच्यासोबत मुलगा आरव, सिमर आणि बहीण अलका हिरानंदानी उपस्थित होती. अक्षयसह त्याच्या मुलानेही पारंपारिक पोशाख परिधान केला होता.


अक्षयचे आगामी प्रोजेक्ट (Akshay Kumar Upcoming Project)


अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एकीकडे 'गदर 2' (Gadar 2), रजनीकांतचा 'जेलर' (Jailer) हे सिनेमे धुमाकूळ घालत असताना 'ओएमजी 2' या सिनेमाने चांगलीच कमाई केली. रिलीजआधी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, कथानक, दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं. आता अभिनेत्याचा 'मिशन राणीगंज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अक्षय कुमारने 1987 मध्ये मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. ऑंखे, भूल-भुलैया, केसरी, खाकी, पॅडमॅन, ओएमजी, हेरा फेरी असे त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आता अभिनेत्याच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Akshay Kumar : India VS Bharat दरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय; 'Mission Raniganj'ची टॅगलाईन बदलली