Mitali Mayekar: अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. मिताली मयेकरनं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मितालीनं शेअर केलेल्या व्हिडीओवर  सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


मिताली मयेकरनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लिहिलं दिसत आहे की, 'जेव्हा तुम्ही वेगळ्या देशात असता तेव्हा आजारपण, एकटेपणा, बोअरिंग हे सगळे तुम्हाला जाणवते.  त्यानंतर मिताली व्हिडीओमध्ये पिझ्झा खाताना दिसते. मितालीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला सिद्धार्थ चांदेकरनं कमेंट केली, 'डोलो घे बाळ एक!' सिद्धार्थच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. मितालीनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, 'शंभर प्रॉब्लेम, एक सॉल्युशन'


पाहा व्हिडीओ:








 तसेच मितालीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रोब्लेम तेव्हा होतो, जेव्हा बाहेरच्या जेवणाची चव लागत नाही, आणि तुम्हाला वरण भात लोणचं खावं वाटतं.' मितालीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


मितालीनं 2021 मध्ये अभिनेता  सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि मिताली हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 


मितालीनं या मालिकांमध्ये केलं काम


मिताली ही मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे. तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. मितालीच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मिताली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 712K फॉलोवर्स आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 


सिद्धार्थ चांदेकरचे चित्रपट


सिद्धार्थ चांदेकरनं झिम्मा, गुलाबजाम, क्लासमेट्स, झेंडा आणि वजनदार या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच सिटी ऑफ ड्रिम्स या सीरिजमध्ये देखील सिद्धार्थनं महत्वाची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Mitali Mayekar: 'बार्बीसोबत लगीन करायचंय...'; मितालीच्या व्हिडीओवर सिद्धार्थनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष