Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Day 2 : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहांत धुमाकूळ घालत आहे. किंग खानच्या चाहत्यांमध्ये त्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. त्याच्या एन्ट्रीला सर्व सिनेमागृहांमध्ये टाळ्या-शिट्ट्यांचा जल्लोष प्रेक्षक करत आहेत. गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाने ग्रँड ओपनिंग तर केलीच पण रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.


अॅक्शनचा तडका असलेल्या 'जवान' या सिनेमात समाजातील विविध विषयांवर भाष्य करण्यात आले आहेत. त्यामुळे मनोरंजनासोबत प्रबोधन करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि नयनताराच्या (Nayanthara) जोडीलाही प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. शाहरुखच्या 'जवान'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'पठाण'चा (Pathaan) रेकॉर्ड ब्रेक केला आहे.


'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्सन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection)


'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 74.5 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 53 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन कमी आहे. दोन दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 127.50 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा 'जवान' ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 129.6 कोटींची कमाई केली आहे. 


'जवान' या सिनेमात शाहरुख खानची गर्ल गँग दाखवण्यात आली आहे. ही गर्ल गँग प्रत्येक मिशनसाठी त्याला मदत करते. अभिनेत्री नयनतारा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे 'जवान' या सिनेमात शाहरुख खान वेगवेगळ्या पाच लूकमध्ये झळकला असून या सिनेमात तो दुहेरी भूमिकेत आहे. 'जवान' हा सिनेमा भ्रष्टाचारावर आधारित आहे. 


'जवान' या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची भूमिका छोटी असली तरी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या छोट्या भूमिकेने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाहरुख (Shah Rukh Khan), नयनतारा (Nayanthara), दीपिकासह (Deepika Padukone) विजय सेतुपती (Vijay Sethupathi), संजय दत्त, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा आणि एजाज खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


संबंधित बातम्या


Jawan Review : शाहरुख खानचा 'जवान' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...