एक्स्प्लोर
न्यूयॉर्कमध्ये अक्षय कुमारला एक अनोखी भेट
मुंबई: अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'रुस्तम' प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. पण त्यापूर्वी तो सुट्टीवर अमेरिकेत आहे. यावेळी त्याला न्यूयॉर्कमध्ये एक अनोखी भेट मिळाली. न्यूयॉर्कमधील पारशी समाजाच्या वतीने 'फरवहर' हे पारशी समाजाचं प्रतिक भेट देण्यात आली.
अक्षय सध्या कुटुंबीयांसोबत सुट्टीवर अमेरिकेत आहे. त्याने ट्विटरवरून 'फरवहर' भेट मिळाल्याची माहिती देऊन, त्याचा फोटो शेअर केला आहे.
न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमधील पारसी समुदायाने ही अनोखी भेट दिल्याबद्दल त्याने पारसी समाजाचे आभार मानले आहेत. तसचे त्याचा आगामी चित्रपटा रुस्तमसाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद दिले आहेत. अक्षयने आणखीन एक फोटो ट्विट करून आपल्या सुट्ट्या संपल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये तो आपली मुलगी नितारासोबत आहे.Blessed 2 receive this Faravahar from the Zoroastrian community in NewYork & NewJersey!Thank u 4 ur wishes 4 #Rustom pic.twitter.com/GJAjj2BATI
— Akshay Kumar (@akshaykumar) July 9, 2016
Like all good things,this holiday too comes to an end!Bidding goodbye to New York with the lil one,until next time.. pic.twitter.com/zNWVGDkvVs — Akshay Kumar (@akshaykumar) July 9, 2016टीनू सुरेश देसाईने दिग्दर्शित केलेला रुस्तम हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून या चित्रपटात अक्षयसोबत इलियाना डिक्रूज आणि ईशा गुप्ता काम करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement