Celebs Quit Non Veg: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आहे. अक्षयच्या OMG 2 या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. अक्षयच्या ओएमजी या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. ओएमजी या चित्रपटासाठी अक्षयनं नॉन व्हेज खाणं बंद केलं होतं. जाणून घेऊयात अशा अभिनेत्यांबद्दल ज्यांनी त्यांच्या मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकेंसाठी नॉन खाणं बंद केलं...


अक्षय कुमार (Akshay Kumar) 


अक्षय कुमारने ओएमजीमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने कृष्णाच्या भूमिकेसाठी मांसाहार सोडला होता. अक्षय कुमारची आई भगवान कृष्णाची भक्त होती. आपल्या मुलाने भगवान श्रीकृष्णाच्या आदर्शांचे पालन करावे त्यांची ईच्छा होती. अक्षयनं जेव्हा त्याच्या आईला भगवान कृष्णाच्या भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा तिने आपल्या मुलाला नॉन व्हेज खाणं बंद करायला सांगितलं. 






दारा सिंह (Dara Singh)


रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. ते आधी एक कुस्तीपटू होते आणि त्याच्या आहारात मांसाहार, अंडी यांचा समावेश होता, परंतु हनुमानाची भूमिका करताना त्याने मांसाहार सोडला. दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंहने एका याबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. जब वी मेट या चित्रपटात देखील दारा सिंह यांनी काम केलं. अपना पंजाब हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाची त्यांनी निर्मिती देखील केली होती.






अरुण गोविल (Arun Govil)


अरुण गोविल यांनी रामायणात रामाची भूमिका साकारली होती. अरुण गोविल हे आधी सिगारेट ओढायचा पण एकदा एका चाहत्याने त्याला सिगारेट ओढताना पाहिलं. त्यानंतर या भूमिकेसाठी त्याने धूम्रपान सोडले होते.




इतर महत्त्वाच्या बातम्या:


OMG 2 Teaser Out: "रख विश्वास, तू है शिव का दास"; ओएमजी-2 चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस