एक्स्प्लोर

सेल्फी घेणाऱ्या फॅनला बॉडीगार्डचा मार, अक्षयकडून दिलगिरी

मुंबई : अभिनेता अक्षयकुमारच्या एका चाहत्याला आपल्या लाडक्या खिलाडीकुमारसोबत सेल्फी काढणं चांगलंच महागात पडलं. सेल्फी काढल्यानंतर अक्षयच्या बॉडीगार्डने चाहत्याला डोक्यात मारल्याचं समोर आलं आहे. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अक्षयने आपल्या फॅनची दिलगिरी व्यक्त केली आहे.   मुंबई विमानतळावर संबंधित चाहता आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत होता. अक्षय येताच अनेकांप्रमाणे त्यालाही सेल्फीचा मोह आवरता आला नाही. त्याने अक्षयकुमार सोबत फोटो काढला आणि त्यानंतर अचानकपणे बॉडीगार्डचा 'प्रसाद' मिळाला. विशेष म्हणजे अक्षयसोबत अनेक वर्ष काम करणाऱ्या या सुरक्षारक्षकाचा पारा चढल्याचं पाहून उपस्थितांनाही आश्चर्य वाटलं. सेल्फी काढल्यानंतर अक्षय निघून गेल्यामुळे त्याला प्रकाराची त्यावेळी कुणकुणही लागली नाही.   मात्र या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अक्षयने ट्विटरवरुन चाहत्याची दिलगिरी व्यक्त केली आहे. 'जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. मी त्यावेळी विमानतळावर होतो. मी काहीतरी गडबड झाल्याचं ऐकलं. वळून पाहिलं, पण मला काहीच चुकीचं नाही जाणवलं. घडलेला प्रकार जेव्हा माझ्या कानावर आला, तेव्हा मी माझ्या बॉडीगार्डला बोलावून घेतलं आणि सक्त ताकीद दिली. मी मनापासून चाहत्याची माफी मागतो.     https://twitter.com/akshaykumar/status/726071747074625538   चाहते माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि असे प्रकार खूप वेदनादायी आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची मी हमी देतो.' 2014 मध्ये मुंबईच्या मालाडमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना एका डेन्टिस्टने अक्षयशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉडीगार्डने त्याला चपराक लगावली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आणि सुरक्षारक्षकाला कडक शब्दांत समज देऊन सोडून देण्यात आलं.   अक्षय सध्या रोबो 2.0 सिनेमाचं शूटिंग करत असून त्याचा हाऊसफुल 3 हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Virat Kohli and Rohit Sharma  विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Embed widget