एक्स्प्लोर
जेव्हा परशा सल्लूला भेटतो...

मुंबईः 'सैराट'फेम आकाश ठोसर अर्थात परशाची नुकतीच सुपरस्टार सलमान खानसोबत भेट झाली. दोघांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे. आकाश सध्या महेश मांजरेकर यांच्या सिनेमात काम करत आहे. सलमान खानने देखील सैराट सिनेमाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर दोघांनी भेट घेतली असावी असा अंदाज लावला जात आहे. आकाश आणि सैराटची टीम नुकतीच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसली होती. सैराटने बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील भूरळ पाडली आहे. मात्र आकाश आणि सलमानच्या भेटीचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. महेश मांजरेकर यांच्या आगामी सिनेमातून परशा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















