Aishwarya Rai Viral Video : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. असं असलं तरी ती, सातत्यानं चर्चेत मात्र आहे. सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक (Abhishek Bachchan) बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट कपल्सपैकी एक. पण, सध्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, असं असलं तरीदेखील दोघांपैकी कुणाची अद्याप यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य केलंल नाही. अशातच सध्या ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. फिल्मफेयर अवॉर्ड फंक्शनचा हा व्हिडीओ असून त्या सोहळ्यात ऐश्वर्या राय सुजलेले डोळे आणि हाताला झालेल्या दुखापतीसह पोहोचली होती. ऐश्वर्याची परिस्थिती पाहून सर्वचजण हैराण झाले होते. 


तब्बल 24 वर्षांपूर्वी म्हणजेच, 2000 साली फिल्मफेयर अवॉर्ड फंक्शनमध्ये Aishwarya Rai ला 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस म्हणून अवॉर्ड मिळाला होता. या फिल्ममध्ये ऐश्वर्या आणि सलमान खाननं स्क्रिन शेअर केली होती. त्यावेळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींनी ऐश्वर्याचं नाव जाहीर केलं आणि खाली ऑडियन्समध्ये बसलेली ऐश्वर्या राय अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर पोहोचली. पण, त्यावेळी तिला पाहून चाहते पुरते हादरुन गेले होते. 


VIDEO : सुजलेले डोळे, हाताला दुखापत, तशीच फिल्मफेयर अवॉर्ड घ्यायला पोहोचली ऐश्वर्या राय



सुजलेले डोळे गॉगल्सनी लपवलेले, तर हाताला कास्ट घातलेला 


ऐश्वर्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती आणि तिच्या हातावर मऊ कास्ट लावण्यात आला होता. हाताला दुखापत झाली होती. डोळ्याची दुखापत लपवण्यासाठी ऐश्वर्यानं गॉगल घातला असला तरी दुखापत स्पष्ट दिसत होती. पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्यानं तिच्या आई-वडिलांचे आभार मानले आणि तिच्या अवस्थेचं कारणही सगळ्यांना जाहीरपणे सांगून टाकलं.


दुखापतीबाबत ऐश्वर्यानं सांगितलेलं 'हे' कारण


ऐश्वर्या म्हणाली होती, "एका आठवड्यापूर्वी मी पडलेले. एक छोटासा अॅक्सिडंट झालेला. मी माझ्या घराच्या बाहेरच्या पायऱ्यांवरून घसरुन खाली पडले, पण मी देवाचे आणि माझ्या पालकांचे आभार मानते की, माझ्यासोबत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, एकही हाड मोडलेलं नाही."


अशा अवस्थेत फंक्शनमध्ये का गेलीस? काळजीनं चाहते झालेले व्याकूळ 


ऐश्वर्या पुढे जाताना म्हणाली की, "लोक म्हणाले की, आज तू असा अवस्थेत का आलीयेस? पण, ही एक संधी आहे, जी मला माझे प्रेक्षक आणि या फिल्म इंडस्ट्रीला थँक्यू बोलण्यासाठी मिळाली आहे. यामुळेच मी आज इथे स्टेजवर आहे." तसं पाहिलं तर काही महिन्यांपूर्वीही ऐश्वर्या रायच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं. कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाताना तो हातावर स्लिंग आणि कास्ट घालून दिसली होती. ऐश्वर्या घसरून घरात पडल्याचं सांगण्यात आलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?