Aishwarya Rai ED Summoned : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai)  पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यानुसार ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिली होती. आता ऐश्वर्या राय-बच्चनची ईडीने तब्बल सहा तास चौकशी केली आहे. 


ऐश्वर्या राय बच्चनची ईडीने फेमा (FEMA) च्या तरतुदीनुसार म्हणजेच परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार जबाब नोंदवला आहे. सुमारे सहा तास ऐश्वर्याची चौकशी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार ऐश्वर्याने पनामा पेपर्स लीक प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रेदेखील तपासकर्त्यांसमोर सादर केली आहेत. 


काय आहे बच्चन कुटुंबाचे पनामा पेपर लीक कनेक्शन?
2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 1.5 कोटी कर कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश होता. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामामध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होते. या कंपनी 1993 मध्ये तयार केले गेले. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स मध्ये होते.  या सर्व कंपन्या शेल म्हणेजच फक्त कागदावर असणाऱ्या खोट्या कंपन्या होत्या ज्यांचा वापर कर चुकवण्यासाठी आणि काळा पैसा लीगल करण्यासाठी वापरल्या गेल्याचा आरोप आहे.  तपासामध्ये असं दिसनू येत आहे की  या कंपन्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्याची किंमत कोट्यावधी होती. पण पेपर वर फक्त 5 हजार ते 50 हजार डॉलर्सची भांडवल असल्याच दाखले गेलं. 


ऐश्वर्याला यापैकी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. त्याचे मुख्यालय व्हर्जिन बेटांवर होते. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्या कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली.


संबंधित बातम्या


Aishwarya Rai ED Summoned : ऐश्वर्या राय-बच्चन चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर


सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या गिफ्टमुळं बॉलिवूडच्या 15 नायिका रडारवर, ईडीकडून चौकशीची शक्यता


हेमा मालिनींचा आम्ही आदर करतो, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रीया  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha