Vicky Katrina Update : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केले. कतरिनाने काल एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत समुद्र दिसत होता. कतरिनाने सोशल मीडियावर मेहेंदीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आज करतिनाने 'एक दुजे के लिये' स्टाईल फोटो शेअर केला आहे. 


कतरिना आणि विकी कौशल सध्या नवविवाहित आयुष्याचा आनंद घेत आहे. कतरिना कैफ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वैवाहिक आयुष्याची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. कतरिनाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या नवीन घराची झलक दिसते आहे. 



लग्नाच्या काही तासांनंतर या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवर कॅप्शन लिहिली होती,"तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत". कतरिनाने शेअर केलेल्या मेहेंदीच्या फोटोत नेटकरी विकीचे नाव शोधताना दिसत आहेत.





कतरिनाने 'एक दुजे के लिये' स्टाईल फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये घर असे लिहिले आहे. कतरिनाच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. कतरिना आणि विकी कौशलचे लग्न 9 डिसेंबरला सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये पार पडले. या शाही लग्नसोहळ्यात फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha