मुंबई : सुकेश चंद्रशेखरमुळे शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूरही ईडीच्या रडारवर आले आहेत. सुकेशकडून महागडं गिफ्ट घेतलेल्या 15 अभिनेत्रींवर ईडीची नजर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेशच्या चौकशीत बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची नावं समोर आल्याची माहिती मिळत आहे. याआधी जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी झाली होती.
बॉलिवूड कलाकारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरूच आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनंतर आता बॉलिवूडचे कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत. या यादीमध्ये बॉलिवूडमधील काही मोठी नावे समोर आली. अशाप्रकारे एकूण 15 कलाकारांची नावे ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुकेशकडून त्यांनी अतिशय महागडे गिफ्ट घेतले असून अशा 15 अभिनेत्रींवर ईडीची नजर आहे. दोनशे कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सुकेशला ईडीने अटक केली आणि या पैशांचा वापर सुकेशने हे महागडे गिफ्ट देण्यासाठी केला असल्याचा संशय ईडीला आहे.
रॅनबॅक्सीचे प्रवर्तक शिवेंद्र सिंह यांची पत्नी आदिती सिंह यांनी आरोप लावले होते की, त्यांचे पती तुरुंगात असताना सुकेशचंद्राने जामीन मिळवून देण्यासाठी सरकारी अधिकारी असल्याचा भासवून त्यांच्याकडून 200 कोटी रुपये उकळले होते. सुकेशचंद्र तुरुंगात बसून खंडणीचा रॅकेट चालवत होता.
सुकेशने नोरा फतेहीला एक आलिशान बीएमडब्ल्यू कार, आयफोन आणि एक कोटी रुपये दिल्याचे ईडीला आढळले. इतकंच नाही तर दोघांचे चॅटही समोर आले आहेत. "ती खूप आवडत असल्याने तिला महागडे गिफ्ट दिल्याचे सुकेशने ईडीला सांगितले"
जॅकलीन फर्नांडिस
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीने कसून चौकशी केली होती. सुकेश चंद्रशेखरने तिला अतिशय महागडे गिफ्ट दिले होते.
शिल्पा शेट्टी
चौकशीदरम्यान सुकेशने शिल्पा शेट्टीचा उल्लेख केला. तिचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर सुकेशने तिला संपर्क केला होता. शिल्पा ही त्याची मैत्रिण असून जामिनासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती
श्रद्धा कपूर
अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात एनसीबीने अंमली पदार्थांच्या चौकशीसाठी तिला बोलवले होते. तिला या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती, असे सुकेशने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. या अभिनेत्रींसह हरमन बावेज या अभिनेत्याचेही नाव घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखीन कुठले कलाकार ईडीच्या रडारवर येत आहेत ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मात्र या कारवाईमुळे बॉलीवूड पुन्हा हादरलं आहे एवढ मात्र निश्चित आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
Aishwarya Rai ED Summoned : ऐश्वर्या राय-बच्चन चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर