GoodBye 2021 : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि भूमी पेडणेकरला (Bhumi Pednekar) पेटा इंडियाने (PETA) 2021 मधील सर्वात सुंदर शाकाहारी सेलिब्रिटी म्हणून घोषित केले आहे. भूमी क्लायमेट वॉरिअर मोहिमेद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करत असते. तसेच मांस खाणे तिला सोयीचे वाटत नसल्याने ती एक वर्षापूर्वी शाकाहारी झाली होती.





अक्षय कुमारसाठी आरोग्य महत्त्वाचे आहे. प्रथिने मिळवण्यासाठी तो शाकाहाराचा अवलंब करतो. तसेच बॉलीवूडमधील तंदुरुस्त अभिनेत्यांपैकी अक्षय एक आहे. पेटाचे संचालक सचिन बंगेरा म्हणाले, भूमी पेडणेकर आणि अक्षय कुमारने दाखवून दिले आहे की तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.





यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनू सूद, मानुषी छिल्लर, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, शाहिद कपूर, रेखा, अमिताभ बच्चन आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री यांसारख्या दिग्गजांना या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या


तुझं-माझं नातं घट्ट! कतरिनाने शेअर केला विकीसोबतचा 'एक दुजे के लिये' स्टाईल फोटो


Taimur Birthday : तू नेहमी ताठ मानेनं जगशील...कारण तू माझा वाघ आहेस; व्हिडीओ शेअर करत करीनाने दिल्या तैमुरला अनोख्या शुभेच्छा


हेमा मालिनींचा आम्ही आदर करतो, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रीया