Abhishek Bachchan Aishwarya Rai Relationship: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हे देखील बॉलिवूडच्या आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत. चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि काही वर्षांतच त्यांनी लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेक कुटुंबासोबतच्या वेगवेगळ्या सणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या नात्याची बरीच चर्चा सुरु होत असते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 2007 साली लग्नगाठ बांधली. त्यानंतर हे जोडपं आता त्यांच्या लग्नाचा 17वा वाढदिवस साजरा करत आहेत. 


पण इतकं सगळं असूनही ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना मागील काही काळामध्ये उधाण आलं होतं. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट होत आहेत. पण ती तिच्या सासरपासून सध्या दूरच राहत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच या 8 कारणांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. ती कारणं कोणती आहेत, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.


ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांची 8 कारणं 


1. अभिषेक त्याचा पुतण्या अगस्त्य नंदासोबत सॅम बहादूर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. पॅप्सनेही ऐश्वर्याबद्दल विचारले पण अभिषेक हा प्रश्न टाळताना दिसला. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचा लोकांचा संशय येऊ लागला. 


2. सप्टेंबर 2023 नंतर, ऐश्वर्या आणि अभिषेक क्वचितच कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसले. त्यातच ऐश्वर्या राय सासरच्यांसोबत अजिबात दिसली नाही. ऐश्वर्याला तिच्या सासरच्या लोकांवर राग असल्याची चर्चा सुरु झाली. 


3. मनीष मल्होत्राची दिवाळी पार्टी असो किंवा नीता अंबानींच्या घरातील गणेश उत्सव. ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत एकटीच आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, नुकत्याच झालेल्या होळीच्या पार्टीत अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले होते, पण ऐश्वर्याने तिच्या सासऱ्यांपासून अंतर ठेवल्याचं बोललं जात होतं. 


4. मागच्या वर्षी 16 नोव्हेंबरला आराध्याचा 12 वा वाढदिवस साजरा झाला. ज्यामध्ये अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंबातील कोणीही दिसले नाही. ऐश्वर्याने काही मित्र आणि तिच्या आईच्या उपस्थितीत आराध्याचा वाढदिवस साजरा केला होता.


5.आराध्याच्या वाढदिवसापूर्वी, ऐश्वर्या रायने 2 नोव्हेंबर 2023 रोजी तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळीही अभिषेक  पार्टीत दिसला नाही. अभिषेकने फक्त एक फोटो शेअर करत फक्त हॅप्पी बर्थडे लिहिले. 5 फेब्रुवारी 2024 रोजी, अभिषेकच्या वाढदिवशी, ऐश्वर्याने संध्याकाळी अभिषेकला शुभेच्छा दिल्या. त्यानंतरही ऐश्वर्या खूप ट्रोल झाली होती.


6. 2023 च्या दिवाळीला ऐश्वर्या तिच्या सासऱ्यांसोबत नव्हती. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या दिवाळीला मुंबईबाहेर गेली होती आणि अभिषेकही तिच्यासोबत नव्हता.


7. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय आपल्या मुलीसोबत पोहोचली होती. नव्या नवेलीनेही तिथे रॅम्प वॉक केला आणि तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चनही तिला चिअर करण्यासाठी आल्या होत्या. पण तेव्हाही ऐश्वर्याने तिच्या सासऱ्यांपासून पूर्ण अंतर राखल्याचं म्हटलं जात होतं.


8. अलीकडेच बोलायचे झाले तर, 18 मार्चला ऐश्वर्याने तिच्या वडिलांची आठवण करुन देणारा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती तिची आई आणि आराध्यासोबत दिसली. अशा फोटोंमध्ये अभिषेक नेहमी दिसायचा पण यावेळी तो दिसला नाही. 


ऐश्वर्या आणि अभिषेकने 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. अभिषेक आणि ऐश्वर्याने 'धूम 2', 'बंटी और बबली', 'गुरु', 'सरकार राज' आणि 'रावण' सारखे चित्रपट एकत्र केले आहेत.


ही बातमी वाचा : 


Majha Katta : 'चला हवा येऊ द्या' सोडण्याचा निर्णय का घेतला? 'माझा कट्टा'वर निलेश साबळेने अखेर सांगितलं खरं कारण