Aishwarya Rai Dispute Reason With Bachchan Family : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सर्व काही आलबेल नसून त्यांचा घटस्फोट होणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा जरी आता होत असल्या, तरी हे दोघं बऱ्याच वर्षांपासून एकत्र राहत नसल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहेत. बच्चन कुटुंबातील एका व्यक्तीसोबत तिचे मतभेद असल्यामुळे ती वेगळी राहत असल्याचं बोललं जात आहे.

Continues below advertisement


ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबातील दुराव्याचं कारण काय?


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन परिवारासोबत राहत नसल्याचं बोललं जात आहे. अनंत अंबानीच्या लग्नातही ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही, तर ती मुलगी आराध्यासोबत कार्यक्रमाला पोहोचली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही वर्षांपासून बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याचं समोर आलं आहे. बच्चन कुटुंबातील एका व्यक्तीसोबत तिचे मतभेद असल्याचं सांगण्यात येत आहे.


ऐश्वर्याचे बच्चन कुटुंबाशी मतभेद कुणामुळे?


अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बच्चन कुटुंब आणि सून ऐश्वर्या राय वेगवेगळे पोहोचले होते. कॅमेऱ्यासमोर पोझ देतानाही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता, जावई आणि नातवंडांसह दिसले, तर ऐश्वर्या राय मुलगी आराध्या हिच्यासोबत दिसली. त्यानंतर ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील नातं तुटल्याच्या चर्चांना उधाण आलं. ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबातील मतभेदाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. पण बच्चन कुटुंबातील कोणत्या सदस्यामुळे ऐश्वर्या आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये दुरावा निर्माण झाला, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


सासू नाही तर 'या' व्यक्तीसोबत 36 चा आकडा


मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय हिला तिची नंनद श्वेता बच्चन हिच्यासोबत पटत नाही. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला  मुलगी श्वेता बच्चन हिच्या नावे केला होता. ज्यानंतर ऐश्वर्याला ही गोष्ट आवडली नाही, त्यामुळे ती बच्चन कुटुंबावर नाराज झाली, असं बोललं जात आहे. ऐश्वर्या बच्चन कुटुंबातील अभिषेक बच्चन वगळता इतर कोणाशीही बोलत नाही आणि ती सासर सोडून तिच्या माहेरच्या घरी राहते.


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिला खूप सपोर्ट करत आहेत. बिग बींनी त्यांच्या एका पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांची संपत्ती त्यांची दोन मुले अभिषेक आणि श्वेता यांच्यामध्ये समान प्रमाणात विभागली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिचा पती निखिल नंदापासून वेगळी राहते आणि अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यात राहते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय?