Jaya Bachchan on Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यात आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. बच्चन कुटुंबीय काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकमुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चनदेखील (Jaya Bachchan) चर्चेत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यात वाद होत असल्याचंही वृत्त आहे. अशातच आता एकेकाळी सूनेचं कौतुक करणाऱ्या जया बच्चन आता मीडियासमोर आपल्या सूनेबद्दल काहीही बोलताना दिसून येत आहे. 


ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं नातं पूर्वी सासू-सूनेपेक्षा आई-मुलीचं जास्त होतं. इंडस्ट्रीत त्यांच्या या गोड नात्याचं प्रचंड कौतुक होत असे.  जया बच्चन यांनी इंटरनॅशनल बिजनेस टाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्या आपल्या सूनेबद्दल ऐश्वर्याबद्दल भाष्य करताना दिसून आल्या होत्या. 


जया बच्चन ऐश्वर्याबद्दल काय म्हणाल्या?


जया बच्चन म्हणाल्या होत्या,"आराध्या खूप नशीबवान आहे कारण तिच्याकडे एक नर्स आहे. ही नर्स दुसरी तिसरी कोणी नसून 'मिस वर्ल्ड' (Miss World) आहे. ऐश्वर्या आई म्हणून निर्भर आहे. ती कोणावर विसंबून राहत नाही. ही अत्यंत चांगली बाब आहे. पण तरीही ऐश्वर्याने यातून बाहेर पडावं असं मला वाटतं". ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या पाच वर्षांनी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.  


ऐश्वर्या राय सध्या अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अद्याप बच्चन कुटुंबियांनी घटस्फोटाच्या चर्चांबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही. ऐश्वर्याने अभिषेक आणि जया यांच्यासोबत होळीचा सण साजरा केला नव्हता. त्यानंतर पुन्हा ऐश्वर्या-अभिषेकमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. 


ऐश्वर्याने सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत


जया बच्चन यांचा 9 एप्रिल 2024 रोजी 76 वा वाढदिवस होता. यावेळी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी जया बच्चन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय एकमेकांना नापसंत करताना सध्या दिसून येत आहेत. ऐश्वर्याने सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिलेल्या दिसून आल्या नाहीत. ऐश्वर्या आणि जया एकमेकींसोबत बोलतही नाहीत. 'द आर्चीज'च्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान याची झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळेच ऐश्वर्या आणि जया यांच्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.


संबंधित बातम्या


Aishwarya Rai : लग्नाआधी ऐश्वर्या रायची होती 'ही' इच्छा, पण नंतर...; बच्चन कुटुंबियांपासून दुरावल्याचं 'हे' आहे कारण?