Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करून एकमेकांपासून विभक्त होण्याची घोषणा केली. लग्नाच्या चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशा यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं हार्दिकनं पोस्टमध्ये सांगितलं आहे. यानंतर हार्दिकला संपत्तीतील 70 टक्के भाग नताशाला द्यावा लागेल, असं बोललं जात आहे. हार्दिकला त्याच्या 170 कोटी रुपयांच्या संपत्तीमधील मोठा वाटा नताशाला द्यावा लागणार असल्याचं बोललं जात आहे.
हार्दिक-नताशाचा चार वर्षाचा संसार मोडला
हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या नात्यात गेल्या काही काळापासून अडचणी असल्याचं बोललं जात होतं. आयपीएलमध्ये (IPL 2024) नताशा कोणत्याही सामन्यात स्टेडियममध्ये हार्दिकला सपोर्ट करताना दिसली नव्हती, तर त्याआधी दरवर्षी नताशा हार्दिक आणि त्याच्या टीमला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचायची. त्याशिवाय हार्दिकने यावेळी सोशल मीडियावर नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. यामुळे दोघांमधील संबंध चांगले नसल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं.
हार्दिकला 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागणार?
आता नताशासोबत घटस्फोट झाला असल्याने हार्दिक पांड्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागेल का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटस्फोटाची बातमी जेव्हा बातम्यांमधून समोर आली तेव्हा नताशाला किती पोटगी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. आता पुन्हा चाहते सोशल मीडियावर या बातम्या शेअर करताना दिसत आहेत.
घटस्फोटानंतर पांड्या कंगाल?
दरम्यान, 2018 मध्ये हार्दिक पांड्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, त्याने आपली सर्व संपत्ती त्याच्या आईच्या नावावर ठेवली आहे. याचं कारण म्हणजे त्याला भविष्यात त्याच्या उत्पन्नातील 50 टक्के कोणालाही द्यायची इच्छा नाही. नियमानुसार, हार्दिकला घटस्फोटानंतर नताशाला मेंटेनन्स म्हणून काही रक्कम द्यावी लागेल. मात्र ही रक्कम किती असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :