Aishwarya Narkar And Avinash Narkar: अभिनेत्री  तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)  या अभिनेत्रीच्या  'कावाला' (Kaavaalaa) या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. कावाला गाण्याची हूक स्टेप आणि या गाण्यामधील तमन्नाचा डान्स नेटकऱ्यांना आवडला आहे. त्यामुळेच हे गाणंं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. नुकताच कावाला या गाण्यावरील भन्नाट डान्सचा व्हिडीओ अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar)  आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा डान्स


ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या कावाला या तमन्नाच्या गाण्यावरील डान्सच्या व्हिडीओमधील या दोघांच्या एनर्जीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. ऐश्वर्यानं अविनाशसोबतचा हा डान्सचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी त्याची एनर्जी मॅच करायचा प्रयत्न करत आहे.' ऐश्वर्या आणि अविनाश  यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही लाजवत आहात' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'नाद खुळा डान्स'


पाहा व्हिडीओ:






ऐश्वर्या आणि अविनाश हे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.  ऐश्वर्या ही नाटकांमधून आणि चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येते.  या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तर अविनाश हे देखील चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतात. 


'कावाला' हे गाणं  ‘जेलर’ (Jailer)  या चित्रपटातील आहे. या गाण्यात रजनीकांत यांची झलक देखील बघायला मिळते. या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या गाण्यावरील ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्सनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Sonali Patil: सोनालीनं तमन्नाच्या गाण्यावर केला डान्स; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'येत नाही तर कशाला...'