मुंबई : अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सध्या चांगलेच चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील (Social Media) त्यांच्या रील्स तुफान व्हायरल होत असल्याचं चित्र सध्या आहे. दरम्यान त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या देखील अशाच रिल्समुळे चर्चेत आहेत. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर या जोडप्याने केलेला व्हिडीओ हा तुफान व्हायरल झाला होता. तोच आता अविनाश नारकर यांचा याच गाण्यावरील दुसरा व्हिडीओची सध्या चर्चा रंगू लागीलेय. दरम्यान आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर अविनाश नारकर हे आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर पुन्हा एकदा थिरकले असल्याचं पाहायला मिळालं आहे. 


अविनाश नारकर हे सध्या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर ऐश्वर्या नारकर या देखील मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. त्यांची सध्याची खलनायिकेची भूमिका ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतयं. तर त्यांच्या विविध रिल्समुळेही त्या सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. 


अविनाश नारकर यांचा दुसरा व्हिडीओ


आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलं आहे. या गाण्यावर अनेकांनी रिल्स केल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी त्यांच्या बाप्पासोबत देखील या गाण्यावर व्हिडीओ केले. याचा मोह अगदी प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी देखील आवरला नाही. त्यांनी देखील या गाण्यावर रिल्स करत प्रेक्षकांची मनं जिंकली. तर सध्या याच गाण्यावर अविनाश नारकर यांनी दुसरा व्हिडीओ केला आहे.






 त्यांच्या भूईबावडा या गावी ते गणेशोत्सवासाठी गेले होते. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला त्यांनी गावच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. तर नंतर कोकणातील गणपतीची मज्जा देखील त्यांनी सांगितली.  त्यानंतर 'आमच्या पप्पांनी गणपती' आणला या गाण्यावर ते थिरकले. दरम्यान त्यांच्या या रिल्सवर देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


या वयातही या दोन्ही अभिनेत्यांचा उत्साह हा वाखडण्याजोगा असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर बऱ्याच टीका देखील त्यांच्या व्हिडीओवर होत असल्याचं पाहायला मिळतयं. पण तरीही हे जोडपं या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन त्यांची आवड आणि छंद जोपसत आहेत. 


हेही वाचा : 


Jui Gadkari: ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, "पुढचं पाऊल आणि..."