Agastya Nanda-Suhana Khan : मागील अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबातील नात्यांची बरीच चर्चा सुरु आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी तर धुमाकूळ घातला होता. पण आता ऐश्वर्याची जलसावर हजेरीही नव्या चर्चांना तोडं देणारी ठरली. इतकच नव्हे तर अमिताभ (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नंदा हिच्या देखील ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. सिद्धांत चतुर्वेदीसोबत नव्याचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं. या सगळ्यात आता बच्चन कुटुंबात पुन्हा एकदा नव्या नात्याची सुरुवात होणार का असा प्रश्न पडलाय. 


सोशल मीडियावर अमिताभ यांचा नात आणि श्वेता नंदाचा लेक अगस्त्य नंदाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत बॉलीवूडच्या किंग खानची लेक म्हणजेच शाहरुखची लेक सुहाना खान दिसत आहे. इकतच नव्हे तर तो गर्दीमध्ये सुहानाची काळजी घेतानाही दिसतोय. त्यामुळे आता त्यांच्यात नेमकं काय सुरु आहे असा संभ्रम नेटकऱ्यांमध्ये आहे. 


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


व्हायरल भयानीच्या इन्स्टाग्रामवर अगस्त्य आणि सुहानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यामध्ये अगस्त्य सुहानाची गर्दीत काळजी घेताना आणि तिला सावरताना दिसतोय. यावर अनेकांनी कमेंट्स करत यांच्यात नेमकं काय सुरु आहे, असा सवाल केलाय. त्यामुळे सुहाना आणि अगस्त्यमध्ये खरंच काही आहे की ही फक्त मैत्री आहे यावर अद्याप तरी काही भाष्य झालेलं नाहीये. 


नव्या नंदाच्या ब्रेकअपच्या चर्चा


मागील दोन वर्षांपासून नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत होते. त्यातच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या. पण अद्याप तरी यावर कुणीही अधिकृत भाष्य केलेलं नाहीये. सिद्धांत चतुर्वेदी गली बॉय आणि गहरियान या चित्रपटातील त्याच्या इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आहे. अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही, म्हणून त्याने नव्यासोबतच्या नात्यावर कधीच भाष्य केलं नाही. दोघेही अनेकदा लंच डेट आणि डिनर डेटवर त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. 






ही बातमी वाचा : 


Saurabh Gokhale : 'कलावंत' ढोलताशा पथक सोडण्याचा आस्ताद काळेचा निर्णय, सौरभ गौखले म्हणाला, 'त्याचा निर्णय फार टोकाचा...'