एक्स्प्लोर
...म्हणून पुन्हा एकदा इरफानच्या ‘मदारी’ची रिलीज डेट बदलली!

मुंबई : अभिनेता इरफान खानच्या ‘मदारी’ सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ‘मदारी’ सिनेमा 15 जुलैऐवजी आता 22 जुलैला रिलीज होणार आहे. ‘द ग्रेट ग्रँड मस्ती’ सिनेमाच्या निर्मात्यांनी ‘मदारी’च्या वाशू भगनानींना सिनेमाची रिलीज डेट बदलण्याची विनंती केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘मदारी’ची आतापर्यंत दोनदा रिलीज डेट बदलण्यात आलीय. याआधी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘टीई3एन’ सिनेमावेळी म्हणजेच 10 जून रोजी मदारी सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, तेव्हाही रिलीज डेट पुढे ढकलली गेली आणि 15 जुलै ठरवण्यात आली. मात्र, आता ‘द ग्रेट ग्रँड मस्ती’मुळे पुन्हा रिलीज डेट पुढे सरकली आहे. मदारी सिनेमाची रिलीज डेट पुढे मागे होत असली, तरी सिनेमाच्या लोकप्रियतेवर काहीही फरक पडणार नाही, असे सिनेमाचे वितरक वाशू भगनानी यांचं मत आहे. फिल्म इंडस्ट्री खूप मोठं कुटुंब आहे आणि आम्हाला एक-दुसऱ्यासोबत काम करायचंयय त्यामुळे मदारी सिनेमा 22 जुलैला, तर 15 जुलैला द ग्रेट ग्रँड मस्ती रिलीज होईल, असे भगनानी म्हणाले. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘मदारी’ सिनेमा बाप-लेकाच्या नात्यावर आधारित असून, जिमी शेरगीलने या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















