एक्स्प्लोर
सोनू निगमनंतर राम गोपाल वर्मांचाही ट्विटरला रामराम
मुंबई : गायक सोनू निगमनंतर आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनीही ट्विटरला रामराम ठोकला आहे. 27 मे 2009 मध्ये ट्विटरवर आलेल्या राम गोपाल वर्मांनी 27 तारखेलाच ट्विटर सोडलं.
‘जन्म 27 मे 2009 आणि मृत्यू 27 मे 2017’ असं त्यांनी आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये म्हटलंय. व्हिडीयो आणि फोटोंद्वारे इंस्टाग्रामवरुन चाहत्यांशी संपर्कात राहिल, असं राम गोपाल वर्मांनी शेवटच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सध्याच्या काळात आपलं मत मांडण्याचं सोपं आणि साधं माध्यम म्हणून ट्विटरकडे पाहीलं जातं. इथे कुठल्याही स्तरातील व्यक्ती कोणत्याही विषयावर आपलं मत मांडतो. याला ना शब्दांची सिमा आहे, ना नैतिकतेची. ट्विटरवर अनेकदा मोठ्या सेलिब्रिटींनाही ट्रोल केलं जातं.
काही दिवसांपूर्वीच महिलांविषयी अवमानजनक ट्वीट केल्याने गायक अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यानंतर गायक सोनू निगमनेही 24 ट्वीट करुन आपलं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं
ज्या प्रकारे अभिजीत भट्टाचार्यने मत मांडलं, त्याप्रकारे अनेक जण आपलं मत मांडतात. अनेक जण आपल्या ट्विटमधून शिवीगाळ करतात. नैतिकतेच्या सिमा सोडून अनेक जण आपलं मत परखड पणे मांडतात. मग त्यांच्या बाबतीत अशी कारवाई का होत नाही? असा सवाल सोनू निगमने ट्विटर सोडण्यापूर्वी केला होता.
संबंधित बातम्या :
24 ट्वीट करुन सोनू निगमचा ट्विटरला अलविदा
महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement