Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' सिनेमाची आता न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या (NYIFF) ओपनिंग फिल्ममध्ये निवड करण्यात आली आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. 


जितेंद्र जोशीने लिहिले आहे,"लहानपणी नदीवर टप्पे खेळायची शर्यत लागायची. कधी एक, कधी तीन पडायचे. पण पाच टप्पे पडण्याची ही पहिलीच वेळ. आता गोदावरीकाठी आम्ही गोदावरी मांडली. कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर हा पाचवा टप्पा. या मानाच्या फेस्टिवलचा श्रीगणेशा होतोय गोदावरीपासून. अर्थात फेस्टिवलची ओपनिंग फिल्म.
आणि या निर्णायक टप्प्यात आणखी एक आनंदाची बातमी. गोदावरीला एका नव्या खेळगड्याची सोबत लाभली आहे. जिओ स्टुडिओ प्रस्तुत गोदावरी".






जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार 'गोदावरी' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं आहे. 


'गोदावरी' ही निशिकांतची कथा आहे, जो आपल्या कुटुंबापासून दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी तो पुन्हा घरी येतो. त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला 'त्या' नदीजवळ मिळणार आहेत, ज्या नदीचा त्यानं इतकी वर्षं तिरस्कार केला. 


संबंधित बातम्या


Oscars 2022 Live Streaming : सिनेप्रेमींना 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या..


Amol Kolhe : पुष्पाची क्रेझ, यह टायर तो फायर निकला... डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ


Sana Khan : दुबई भ्रमंतीत सना खानने घेतला 24 कॅरेट चहाचा आस्वाद! बुर्ज खलीफाच्या 'या' चहाची किंमत ऐकलीत?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha