Sana Khan : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सना खान (Sana Khan) ही नेहमी चर्चेत असता. सनानं बिझनेसमॅन मुफ्ती अनस सैय्यदसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सनानं अभिनय क्षेत्रामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. सना तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सनाच्या फोटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.  सनानं नुकताच एक खास फोटो शेअर केला. या फोटमध्ये ती बुर्ज खलिफावरील एका हॉटेलमध्ये 24 कॅरेट सोन्याचा वापर करून तयार केलेल्या चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे. 


सनानं बुर्ज खलिफामधील जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या Atmosphere Dubai या हॉटेलमध्ये 24 कॅरेट सोन्याचा वापर करून तयार केलेला चहा पिला. सनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती चहा पिताना दिसत आहे. फोटो शेअर करून सनानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'जीवनामध्ये स्वत: ची तुलना चुकीच्या पद्धतीनं पैसे कमावणाऱ्या लोकांसोबत करू नका. '  






चहाची किंमत महितीये? 
Atmosphere Dubai मध्ये मिळणाऱ्या या 24 कॅरेट सोन्यानं तयार केलेल्या चहाची किंमत 3300 रुपये आहे. Atmosphere Dubai हे जगातील सर्वात उंचावर असणार हॉटेल आहे त्यामुळे इथे मिळणाऱ्या पदार्थांची किंमत जास्त असते. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha