Oscars 2022 Live Streaming : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 27 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा पार पडणार आहे. 


ऑस्कर हा जगभरात अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. तर भारताच्या 'राइटिंग विथ फायर' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे.


'ऑस्कर 2022' कधी होणार जाहीर?
लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा होणार आहे. तर 28 मार्चला भारतात या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.





'ऑस्कर 2022' पुरस्कार सोहळा कुठे पाहता येईल?
अनेक सिनेरसिक ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा पुरस्कार सोहळा भारतीय सिनेसरिकांना 28 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवर पाहता येणार आहे. 


संबंधित बातम्या


RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!


Sher Shivraj, Waghnakh : एकीकडे ‘शिवराज अष्टक’, तर दुसरीकडे ‘शिवप्रताप’! ‘शेर शिवराज’ला टक्कर देणार ‘वाघनखं’


Ajay Devgn : 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला अजयनं दिलं उत्तर; म्हणाला...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha