Happy Birthday Aftab Shivdasani: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani) आज (25 जून) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. 25 जून 1978 रोजी मुंबईत जन्मलेल्या आफताबने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहेत. मात्र, सध्या तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आफताबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया...


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानी आज 44 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 25 जून 1978 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आफताबने एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयामुळे त्याने इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवले आहे. आफताब बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, त्याचे स्टारडम आजही कायम आहे. मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतरही आफताबचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत, जे आजही त्याला तितकेच प्रेम देतात.


अवघ्या 14व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण


आफताबने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आफताब 14 वर्षांचा असताना बेबी फूडच्या एका ब्रँडने त्याची जाहिरातीसाठी निवड केली होती. यानंतर आफताब अनेक अॅड फिल्म्समध्ये झळकला होता. आफताब अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' या सुपरहिट चित्रपटात दिसला होता. 'शहेनशाह' चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय 'अव्वल नंबर', 'चालबाज' आणि 'इन्सानियत' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने उत्तम अभिनय केला होता.


मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण!


त्याने 1999मध्ये वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या 'मस्त' चित्रपटातून प्रमुख अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात त्यांच्यासोबत उर्मिला मातोंडकरने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.


यानंतर त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आणि मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर असे अनेक पुरस्कार मिळाले. आफताबने 'मस्ती', 'ग्रँड मस्ती' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती'सह अनेक प्रौढ चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2014 मध्ये त्याने मेनिन दुसांजशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगीही आहे.


जगतोय लक्झरी जीवन


आफताबचे फिल्मी करिअर म्हणावे तितके खास नव्हते, पण तरीही तो लक्झरी जीवन जगतो. रिपोर्ट्सनुसार, आफताब प्रॉडक्शन हाऊस आणि इतर इव्हेंट्सद्वारे वार्षिक 3 कोटी रुपये कमावतो. त्यांची एकूण संपत्ती 51 कोटींच्या जवळपास आहे. याशिवाय त्याचे मुंबईत स्वतःचे आलिशान घर आहे. आफताबला गाड्यांचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे काही महागड्या गाड्या आहेत.


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Judaa Hoke Bhi Trailer : भयपंटाचा बादशाह विक्रम भट्ट पुन्हा एकदा सज्ज; 'जुदा होके भी'चा ट्रेलर रिलीज


Sarsenapati Hambirrao : सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी; प्रविण तरडेंनी केली खास पोस्ट