Raimohan Parida Dead : गेल्या काही दिवसांपासून भारतीय सिनेसृष्टीतून अनेक दु:खद बातम्या येत आहेत. आता ओडिशा सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा (Raimohan Parida) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायमोहन परिदा यांचा मृतदेह भुवनेश्वरमधील प्राची विहारमध्ये आढळला. पोलिसांनी आता त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टनसाठी पाठवला असून पोलिस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या निधनामुळे ओडिशा सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
100 हून अधिक सिनेमांत केलं काम
रायमोहन परिदा यांनी ओडिशासह अनेक बंगाली सिनेमांतदेखील काम केलं आहे. त्यांनी 100 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. 'सागर' या सिनेमाच्या माध्यमातून रायमोहन परिदा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'सागर'सह त्यांनी बंधना, असिबू केबे साजी मो रानी, तू थिले दारा कहाकु, तोह बिना मो कहानी आधा, छाती चीरिदेले तू अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. सिनेमांसह त्यांनी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरदेखील काम केलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
रायमोहन परिदा यांच्या शेजाऱ्यांपैकी एक जण म्हणाला, रायमोहन परिदा कालच आम्हाला भेटले होते. सर्वांचे लाडके रायमोहन आता राहिले नाहीत यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रायमोहन परिदा यांच्या निधनाने चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या