Adnan Sami Mother Passes Away : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अदनान सामीला मातृशोक झाला आहे. अदनान सामीची आई बेगम नौरीन यामी यांच्या निधनाची मोठी बातमी दु:खद बातमी समोर आली आहे. नौरीन सामी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी नौरीज सामी यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध बॉलिवूड गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर
गायक अदनान सामीने आईच्या निधनाची दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान, आईच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अदनान सामीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्याच्या आईचा फोटो आणि त्यावर 1947 ते 2024 असं लिहिलं आहे.
अदनान सामीच्या आईचं निधन
अदनान सामीने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याची आई बेगम नौरीन सामी खान यांचा फोटो पोस्ट केला आणि खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय, “माझी प्रिय आई बेगम नौरीन सामी खान यांच्या निधनाची अत्यंत दु:खाने मी घोषणा करत आहे. आम्ही दु:खात बुडालो आहोत. ती एक अविश्वसनीय स्त्री होती, जिने तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला प्रेम आणि आनंद मिळायचा. आम्हाला तिची खूप आठवण येईल. माझ्या दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करा. अल्लाह आमच्या प्रिय आईला जन्नत-उल-फिर्दौसमध्ये आशीर्वाद देवो… आमिन…”.
सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी व्यक्त केला शोक
अदनान सामीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला. अभिनेत्री मिनी माथूरने टिप्पणी केली, 'प्रिय अदनान, रोया आणि मदिना, मला तुमच्या नुकसानाबद्दल खूप वाईट वाटते. तुमच्या कुटुंबाला बळ मिळो, हीच सदिच्छा.' गायक राघवने लिहिलं, 'भाऊ, तुमच्यासाठी खूर प्रेम आहे'. याशिवाय एका चाहत्याने लिहिले की, 'काळजी घ्या. देव तुम्हाला या अपार दु:खावर मात करण्याची शक्ती देवो.' तर दुसरा वापरकर्ता म्हणाला, 'अल्लाह त्यांना स्वर्गात सर्वोत्तम स्थान देवो. आई गमावण्यापेक्षा मोठं नुकसान नाही. अल्लाह तुम्हाला हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :