Adipurush Controversy : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित आहे.  प्रभासच्या चाहत्यांना 'आदिपुरुष' हा सिनेमा आवडला आहे. तर दुसरीकडे नेटकरी मात्र सिनेमावर टीका करत आहे. एकंदरीत या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.  


नेमकं प्रकरण काय? (Hindu Sena has filed a PIL in Delhi HC against)


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता प्रभास आणि कृती सेननच्या या सिनेमावर एका हिंदू संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सिनेमाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 


'आदिपुरुष' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या सिनेमावर टीका होत आहे. आता यात आणखी एका वादाची भर पडली आहे. या सिनेमाबाबत एका हिंदू संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या सिनेमामुळे रामायण, राम आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जात असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. 


‘आदिपुरुष’ सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य हटविण्याची मागणी






हिंदू संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की,"आदिपुरुष' सिनेमातील रावण, राम, सीता आणि हनुमाण यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिनेमातील हे दृश्ये रामायणातील धार्मिक पात्रांच्या चित्रकरणाच्या विरुद्ध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 


'आदिपुरुष' सिनेमाच्या प्रदर्शनावर नेपाळमध्ये बंदी


'आदिपुरुष' सिनेमाविरोधात नेपाळमध्येही विरोध होत आहे. सिनेमात सीतेचे वर्णन भारताची कन्या म्हणून करण्यात आले आहे. पण सीतेचा जन्म नेपाळमधील जनकपूरात झाला होता. त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनावर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली. त्यानंतर निर्मात्यांनी सीतेला भारताची कन्या म्हणून वर्णन करणारं दृश्य काढून टाकलं आहे. 


संबंधित बातम्या


Adipurush Online Leak: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच चित्रपट लीक