Adah Sharma On SSR House : अभिनेत्री अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या घरात शिफ्ट झाल्यामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्री अदा शर्मा सुशांत सिंहच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. याचं फ्लॅटमध्ये काही वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चार वर्ष सुशांत सिंहचं मुंबईतील घर बंद होतं. यानंतर अभिनेत्री अदा शर्माने तिथे राहण्यास पसंती दर्शवली आणि घर भाड्याने घेतलं. अदा शर्मा सुशांतच्या घरात शिफ्ट झाल्यावर तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकही केली.


सुशांत सिंहच्या घरात अदा शर्माला वाटते भीती? 


अभिनेत्री अदा शर्मा हिने सुशांत सिंग राजपूतचा मुंबईतील फ्लॅट भाड्याने घेतला आहे, जिथे ती तिच्या कुटुंबासह राहत आहे. जेव्हापासून अभिनेत्री अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे मुंबईतील घर भाड्याने घेतलं आहे. तेव्हापासून तिला काही जण ट्रोल करत आहेत. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी अदा शर्मा या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्याचं काही जण बोलत आहेत. अदाला अनेकदा मुलाखतींमध्ये सुशांतच्या घराबद्दल विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अभिनेत्रीने पहिल्यांदाच सुशांत सिंह राजपूतच्या या घराबद्दलच्या प्रश्नांवर मौन सोडलं आहे.


सुशांत सिंहच्या घरात भास झाला का? 


एका रिपोर्टनुसार, मुलाखतीदरम्यान अदा शर्माला विचारण्यात आले की, सुशांत सिंहच्या फ्लॅटमध्ये तुला काही वेगळं जाणवलं का? काही भास झाला का किंवा भीती वाटली का? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली की हो, मला ते जाणवलं. पण अनेकदा लोक मला भीतीदायक गोष्टी किंवा अनुभवाबद्दल विचारतात. मला वाटतं की, भीतीबद्दल प्रश्न विचारणं चुकीचं आहे. सुशांत हा खूप प्रतिभावान अभिनेता होता. तो त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. तुम्ही त्याची मुलाखत ऐका. तो जे बोलायचा ती हेडलाईन व्हायची. मला लोकांबद्दल काहीही बोलणारी व्यक्ती नक्कीच व्हायचं नाही.


"मला हे घर खूप आवडतं"


अदा पुढे म्हणाली, "मी एक चांगली व्यक्ती आहे, हे कोणालाही सांगण्यासाठी किंवा माझ्या कृतीची कारणे सांगण्यासाठी मी इथे नाही. मला जे करायचं होतं ते मी केलं आणि मी स्वतःला ओळखते. मी इतरांसाठी स्वतःला बदलणार नाही, मी या घरात स्थायिक झाली आहे आणि मला हे घर खूप आवडतं."




महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ekta Kapoor : एकता कपूरसह आई शोभावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, अल्ट बालाजीवरील गंदी बात सीरीजमुळे अडचणीत वाढ