Singham Again First Song Jai Bajrangbali : रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्सचा आगामी चित्रपट सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बहुचर्चित 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं 'जय बजरंगबली' रिलीज करण्यात आलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांनी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता सिंघम अगेन चित्रपटाचं पहिलं गाणं 'जय बजरंगबली' प्रदर्शिक करण्यात आलं असून याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रिलीज होताच हे गाणं ट्रेंडमध्ये आलं आहे. या गाण्यामध्ये अजय देवगण, रणवीर सिंह यांच्या भूमिकांमधील खास कनेक्शन दाखवण्यात आलं आहे.
बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज
'जय बजरंगबली' गाणं हनुमान चालिसापासून प्रेरित असल्याचं दिसत आहे. या गाण्यामध्ये अजय देवगण, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ यांच्यातील नात्याची झलक दिसत आहे. गाण्यात अभिनेता रणवीर सिंह म्हणजेच 'सिम्बा' हनुमानाच्या भूमिकेत असून तो गुंडांशी लढताना दाखवला आहे. यासोबतच या गाण्यात तो 'सिंघम' अजय देवगणला मिठी मारून त्याचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. बाजीराव सिंघम आणि सिम्बाचं नातं राम आणि हनुमानाप्रमाणे दाखवण्यात आलं आहे.
'जय बजरंगबली' गाण्याला प्रेक्षकांची पसंती
मल्टीस्टारर 'सिंघम अगेन' चित्रपटाचा घोषणा झाल्यापासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित या पोलीस युनिव्हर्स चित्रपटात फुल्ल ऑन ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणात आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबतच रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ झळकणार आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार असून अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ खलनायक म्हणून दिसणार आहेत. सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :