Sunil Grover Video Viral : अभिनेता आणि कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.  अनेकदा मजेदार व्हिडीओ बनवत चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सुनील ग्रोव्हरने आपल्या खास स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याची कॉमेडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरते. मात्र यावेळी त्याच्या एका व्हिडीओमुळे तो यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे. या व्हिडीओमुळे नेटकरी त्याला चांगलच ट्रोल करत आहेत.


मजुरासोबत रस्त्यावर झोपला अभिनेता


सुनील ग्रोव्हरने मजुरांसोबत रस्त्यावर झोपल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तो सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सुनील ग्रोव्हर अलिकडेच ऋषिकेशला फिरायला गेला होता. तिथे त्याने देवदर्शन केलं. गंगेत स्नान केल्यानंतर त्याने सात्विक भोजनाचा आस्वादही घेतला. त्यानंतर ऋषिकेशमधील रस्त्यांवर पुढे जाताना चालता-चालता त्याला एका ठिकाणी काही पादचारी आणि मजूर रस्त्यावर झोपलेले दिसले. सुनील ग्रोव्हरही त्याच्या शेजारीच जमिनीवर झोपला होता. याचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


सुनील ग्रोव्हरवर नेटकरी संतापले


ऋषिकेशला गेल्यावर सुनील ग्रोव्हरने त्याची संपूर्ण दिनचर्या रेकॉर्ड केली आणि ती त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आणखी काय हवं, सांग'. सुनीलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. यूजर्सला हा सगळा एक दिखावा वाटत असून त्यांनी त्यावर सुनीलवर निशाणा साधला आहे. मजुरांसोबत झोपलेला असतानाही कॅमेरामनला सोबत घेऊन त्याचा व्हिडीओ कोण काढतं?,असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


संतप्त नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?


एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की, 'श्रीमंत लोकांना पृथ्वीवर खाली पाहण्यासाठी कॅमेरामनसोबत जावं लागतं.' आणखी एका यूजरने लिहिले, 'चांगला अभिनेता. बरं, व्हिडीओ पूर्ण झाला, आता जा आणि तुमच्या 5 स्टार हॉटेलच्या खोलीत झोप'. दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये म्हटलंय, 'इतकं दाखवायची काय गरज आहे? जे जमिनीवर झोपलेले आहेत, ते गरीब मजूर आहेत आणि थकवा घालवण्यासाठी झोपलेले आहेत, पण तुम्ही व्हिडीओ बनवायला झोपला आहात.'






महत्त्वाच्या इतर बातम्या :


चित्रपटांमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री परिणीती आता नोकरीच्या शोधात; सोशल मीडियावर म्हणाली, 'प्लीज मला एअरपोर्टवर नोकरी मिळवून द्या'