Guess The Celebs Name : सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अनेक लोक या फोटोंवरून कलाकार कोण? हे ओळखण्याचा प्रयत्न करत असतात (Stars Childhood Pic). आज आम्ही देखील आमच्या या सेगमेंटमध्ये अशाच एका लहान मुलीचा फोटो घेऊन आलो आहोत. कारण यावेळी तिच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होत आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगी केवळ बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक नाही, तर तिला ग्लोबल स्टार देखील म्हटले जाते.


आता ती आई बनल्याच्या बातमीने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता इतक्या इशाऱ्यांनंतरही तुम्हाला तीचे नाव समजत नसेल, तर वाचा या रिपोर्टमध्ये या अभिनेत्रीचे नाव.


या फोटोमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी दुसरी कोणी नसून, ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आहे, जी नुकतीच एका चिमुकल्या परीची आई बनली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी एक पोस्ट शेअर करून ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.



प्रियांकाने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्ही सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत. या विशेष काळात आम्हाला तुमच्याकडून गोपनीयतेची अपेक्षा आहे. कारण आम्हाला आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे आहे. खूप खूप धन्यवाद.’ ही पोस्ट शेअर करत प्रियांकाने निकला टॅग केले आणि हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. प्रियांका आणि निक जोनास सरोगसीच्या माध्यमातून नुकतेच पालक बनले आहेत.


या क्यूट फोटोबद्दल बोलायचे तर, प्रियांका चोप्रा या फोटोमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोमध्ये तिने बीन हॅट आणि ड्रेसशी जुळणारे क्यूट शूज घातले आहेत. प्रियांका चोप्राने जेव्हापासून आई बनल्याची ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली, तेव्हापासून तिचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले आहेत.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha