Malaika Arora : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या वैयक्तीक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मलायकाचे नाव सर्वात पुढे आहे. मलायका संबंधित फोटो आणि बातम्या पाहिल्याशिवाय चाहत्यांचा दिवस जात नाही. त्यामुळेच ती तिच्या रुटीन लाईफची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या भूतकाळातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
मलायका अरोराने लहान वयातील लग्न आणि कुटुंब नियोजनाबद्दल सांगितले आहे. एका पॉडकास्टमध्ये मलायका म्हणाली, लग्नानंतरही मी ग्लॅमरस राहिली आहे. शिवाय प्रेग्नेंसीनंतरही मी स्वत:ला ग्लॅमरस राखले. लग्नाचा माझ्या करियरवर काहीच परिणाम झाला नाही. लग्नामुळे जसं माझ्या करियरवर कोणताच परिणाम झाला नाही तसाच आई झाल्यानंतरही माझ्या व्यावसायिक जीवनावर काही परिणाम झाला नाही.
मलायकाच्या म्हणण्यानुसार, गरोदरपणात ती तिच्या कामात जास्त सक्रिय झाली होती. मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले होते. परंतु, 2017 मध्ये ते दोघे जण वेगळे झाले. या दोघांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. मलायका आणि अरबाज दोघे मिळून याचा सांभाळ करतात. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे (Arjun Kapoor) ब्रेकअप झाले आहे. गेल्या एक आठवड्यापासून दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. अद्याप यासंदर्भात अर्जुन किंवा मलायकाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही त्यांचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
- काय आहे मलायका अरोराच्या सौंदर्याचं गुपित? स्वत: शेअर केल्या 'या' ब्युटी टिप्स!
- लॉकडाउनच्या काळात अर्जुन कपूर सोबत रहायची मलायका अरोरा, एका मुलाखतीत केला खुलासा
- काय आहे मलायका अरोराच्या सौंदर्याचं गुपित? स्वत: शेअर केल्या 'या' ब्युटी टिप्स!
- PHOTO : मलायका अरोरा आणि कटरिना कैफचा सेम टू सेम लूक व्हायरल